21 June, 2017

सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुरक्षा जवानांची महाभरती
        हिंगोली, दि. 21 : सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे हिंगोली जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व एस.आय.एस. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमीत कमी 10 वी पास, वय 18 ते 35 वर्षे, वजन किमान 50 किलो ग्रॅम, उंची 165 सें.मी. पेक्षा जास्त असलेल्या फक्त पुरुष उमेदवारांसाठी खाजगी सुरक्षा रक्षकांची 500 पदे भरावयाची आहेत.            
रिक्तपदे रोजगार मेळाव्याद्वारे पुढील ठिकाणी आयोजित केली आहे. 1) दि. 30 जून, 2017 व 01 जुलै, 2017 रोजी शासकीय डी. एड. महाविद्यालय जुन्या जिल्हा परिषद जवळ, हिंगोली, दि. 02 व 03 जुलै, 2017 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, वसमत, दि. 04 व 05 जुलै, 2017 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल कळमनुरी येथे सकाळी 10 ते 01 या वेळेत भरती आयोजित केली आहे.  
          रोजगार मेळाव्याच्या भरतीसाठी येताना उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावीत व आपली निवड झाल्यास 200/- रुपये फीस आवश्यक राहील. ही फीस एस.आय.एस. यांची नोंदणी फीस आहे. फीसशी सदर कार्यालयाचा कुठलाही संबंध नाही.  
          नोकरीवर हजर/रुजू झाल्यावर संबंधीतास किमान वेतन रु. 8 हजार दरमहा मिळेल तसेच पी. एफ., पुर्ण परिवाराकरीता मोफत वैद्यकीय सुविधा, ग्रॅच्युटी, वेतनवाढ, प्रमोशन, टिए/डिए चार्जेबल मेस, इत्यादी सुविधा एस. आय. एस. इंडिया सेक्युरिटी लि. पूणे या कंपनी तर्फे लागू होतील गरजू व इच्छूक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या महाभरतीत मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा. असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे. नोकरीस इच्छूक व गरजू उमेदवारांनी भ्रमणध्वनी क्रमांक, 9011265784, 9665208980, तसेच 02456-224574 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयामार्फत कळविण्यात येत आहे.

*****

No comments: