तरुण
व पात्र प्रथम मतदारांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.
31 : भारत
निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21
वर्षे) मतदार नोंदणी करण्यासाठी दिनांक: 01 जुलै, 2017 ते 31 जुलै, 2017 या
कालावधीत विशेष मोहिम राबविण्याचे ठरविले असून सदर विशेष मोहिम हिंगोली
जिल्ह्यातील 92- वसमत, 93- कळमनुरी व 94- हिंगोली विधान मतदारसंघात उपविभागीय
अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी
अधिकारी (AERO) यांचे स्तरावर राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत दि. 8
जुलै, 2017 व दि. 22 जुलै, 2017 रोजी मतदार नोंदणी संदर्भातील विहीत नमुने स्विकारण्यासाठी
मतदान केंद्राचे ठिकाणी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष शिबीराच्या
दिनांक व्यतीरिक्त उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि तहसिलदार
तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांचे मार्फत त्यांची कार्यालये, मतदान केंद्रे,
शासकीय खाजगी शैक्षणिक संस्था (शाळा/ कॉलेज) येथे मतदार नोंदणी संदर्भातील विहीत
नमुने स्विकारण्यात येतील. नमुना-6 मधील http://www.nvsp.in/ या पोर्टलव्दारे
ऑनलाईन स्वरूपात सादर करता येतील. तसेच नविन तरुणांना ( 18 ते 21 वर्षे वयोगट)
आपले नमुना-6 मधली अर्ज पोस्टाव्दारे सादर करता येतील.
या विशेष मोहिमेतंर्गत दि. 01 ते 31 जुलै, 2017
या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत त्यांचे
कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीपासून वंचित असलेल्या व्यक्तींचे घरोघरी जाऊन 18 ते
21 या वयोगटातील व्यक्तींकडून नमुना- 6 भरून घेण्यात येतील. या विशेष मोहिमेतंर्गत
अधिकृत नोंदवही मधील मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे मतदार यादीमधून वगळण्याची
कार्यवाही संबंधीत यंत्रणांच्या सहभागाने करण्यात येणार आहे.
या विशेष मोहिमेतंर्गत प्राप्त होणारे नमुना 6
व 7 मधील सर्व अर्ज भारत निवडणूक आयोगाव्दारे तयार करण्यात आलेल्या ERO-Net या
ऑनलाईन सॉफ्टवेअर व्दारे निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीतील नोंदी दुरूस्त
करण्यासाठी व त्याच मतदारसंघात स्थलांतर करण्यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या
अनुक्रमे नमुना 8 व नमुना 8अ मधील अर्जांची कार्यवाही ही विशेष मोहिम संपल्यानंतर
करण्यात येणार आहे.
दि. 01 जुलै, 2017 रोजी ज्या भारतीय नागरीकाचे
वय 18 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्याची जन्म तारीख दि. 01 जुलै, 1999 वा
त्यापुर्वीची आहे व जो संबंधीत भागाचा सामान्य रहिवासी आहे अशी व्यक्ती मतदार
म्हणून नोंदणीस पात्र आहे. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी भरावयाचे नमुना 6 मधील
व मतदार यादीतून नाव वगळणीसाठी भरावयाचे नमुना 7 मधील अर्ज दि. 01 जुलै, 2017 ते
31 जुलै, 2017 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी
(ERO), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांचे कार्यालये / सर्व मतदान
केंद्रे आणि सर्व मतदार मदत केंद्रे येथे उपलब्ध आहेत. संबंधीत नागरीकाने
योथोचित्तरित्या भरून स्वत: सादर केलेले अर्ज उपरोक्त सर्व ठिकाणी स्विकारले
जातील.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 अन्वये विहीत
केलेल्या कार्यपध्दतीचे अनुपालन करून, छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त
पुनरिक्षण कार्यक्रम- 2017 अंतर्गत मयत झालेले मतदार, अन्यत्र स्थलांतरीत झालेले
मतदार, तसेच दुबार नोंदणी असलेल्या काही मतदारंची नावे वगळण्यात आली आहेत. अशा
वगळण्यात आलेल्या आणि या मोहिमेतंर्गत वगळी करण्यात येणाऱ्या मतदारांच्या नावांची
यादी, उप विभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO)/
तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांची
कार्यालये तसेच https://ceo.maharashtra.gov.in/
या संकेतस्थळावर मतदारसंघनिहाय व भागनिहाय उपलब्ध आहे.
कोणतीही व्यक्ती जे खोटे आहे
असे तिला माहिती आहे किंवा जे खोटे आहे असे तिला वाटते किंवा जे खरे असे तिला वाटत
नाही असे निवेदन किंवा प्रतिज्ञापन करील ती व्यक्ती शिक्षेस पात्र ठरेल.
हिंगोली जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक
मतदार नोंदणी अधिकारी यांचा तपशिल पुढिल
प्रमाणे आहे.
अ.क्र.
|
मतदार संघ क्र. व नाव
|
मतदार नोंदणी अधिकारी
|
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी
|
1
|
92-
वसमत
|
उप
विभागीय अधिकारी,वसमत.
|
तहसिलदार, वसमत.
|
तहसिलदार, औंढा ना.
|
|||
2
|
93-
कळमनुरी
|
उप
विभागीय अधिकारी, कळमनुरी.
|
तहसिलदार, कळमनुरी.
|
तहसिलदार, हिंगोली.
|
|||
तहसिलदार, औंढा ना.
|
|||
3
|
94-
हिंगोली
|
उप
विभागीय अधिकारी, हिंगोली.
|
तहसिलदार, हिंगोली.
|
तहसिलदार, सेनगाव.
|
अधिक माहितीसाठी
https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी .
*****
No comments:
Post a Comment