साहित्यरत्न लोकशाहिर
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत
हिंगोली, दि. 22: सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात 10 वी व 12 वी पदवी,
पदव्युत्तर, वैद्यकिय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा
जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थी
/ विद्यार्थीनींना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन
राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
या शिष्यवृत्ती करिता पात्र असलेल्या विद्यार्थी / विद्यार्थींनी कडून
10 जुलै, 2017 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासोबत पुढील
कागदपत्र साक्षांकित करून जोडावे. 1) जातीचे प्रमाणपत्र, 2) उत्पन्नाचे प्रमाणपत्र,
3) शाळा सोडल्याचा दाखला, 4) मार्क लिस्ट, 5) पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याचा पुरावा,
6) फोटो आणि 7) आधार कार्ड.
वरील माहिती पुढील पत्यावर पाठविण्यात यावी - साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ
साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, हिंगोली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवन जिल्हा सरकारी रुग्णालयाचे पूर्व बाजूस दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली
फो. क्र. 02456-223831 या पत्यावर पाठविण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक लोकशाहिर अण्णाभाऊ
साठे विकास महामंडळ, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment