खुला प्रवर्गासाठी फोटोग्राफी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि. 14 : स्थानिक हिंगोली येथे खुल्या प्रवर्गाकरिता सर्वसाधारण योजने अंतर्गत
फोटोग्राफी वर आधारित एक महिना कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर
कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,
(एम.सी.ई.डी.) हिंगोली व्दारा आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमातून
स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमात संगणक बद्दल माहिती,
पासपोर्ट फोटो, इनडोर व आऊटडोर फोटोग्राफी, मिक्सींग, इत्यादी विषयी या प्रकारचे
अनेक तांत्रिक प्रात्यक्षिक रित्या प्रशिक्षण दिल्या जाणार आहे सोबतच व्यवसाय
मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली,
आदी बाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण
कार्यक्रमात युवक व युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 35,
शिक्षण 7 वी पास, शिक्षण सुरू नसावे. नॅशनल बँकेचे पासबुक झेरॉक्स आवश्यक आहे.
प्रवेशाची अंतिम तारीख 15 जून, 2017 च्या दुपारी 4.00 वाजेपर्यंत राहणार आहे. कार्यक्रम
आयोजक सोमनाथ खाकरे मो. 9145452209 एमसीईडी व्दारा एमसीईडी हॉल जिल्हाधिकारी
कार्यालय, हिंगोली ता. जि. हिंगोली यांना प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा या
कार्यक्रमाच्या मुलाखती दि. 16 जून, 2017 रोजी सकाळी 12.00 वाजता एमसीईडी हॉल
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आयोजित करण्यात येणार आहेत, असे जिल्हा
उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प
अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment