लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पर्यावरण सप्ताह साजरा
हिंगोली
दि. 6 : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी देश व राज्याच्या विकासासाठी दिलेले अमुल्य
योगदान विचारात घेऊन त्यांच्याप्रती भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यासाठी जागतिक
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने
अंतर्गत दरवर्षी 03 ते 09 जून हा कालावधी पर्यावरण सप्ताह म्हणून साजरा करण्यात
येतो.
त्या अनुषंगाने, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य व
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ सामाजिक न्याय विभाग व सद् भाव सेवा भावी
संस्था, हिंगोली यांचे वतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. सदर
वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासाठी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त, डॉ. छाया कुलाल,
जिल्हा वन परिक्षेत्र अधिकारी श्री. वाबळे श्री. नंदु नायक, सामाजिक न्याय
विभागांतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी व सामाजिक न्याय भवन येथील सर्व मागासवर्गीय
विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment