परिवहन विभागाची 1 जुलैपासून नवीन सारथी 4.0 प्रणाली
कार्यान्वित होणार
हिंगोली, दि. 27 : वाहन चालविण्याच्या अनुज्ञप्ती करिता (ड्रायव्हिंग
लायसन्स) सारथी 4.0 प्रणाली दि. 1 जुलै, 2017 पासून कार्यान्वित करण्यात येणार
आहे. वाहन चालविण्याच्या अनुज्ञप्ती करीता यापूर्वी
sarathi.nic.in या वेबसाईटव्दारे नागरिकांना अपॉइन्टमेंट घेता येत होती. परंतू
आता सदर प्रणाली बंद करून नवीन parivahan.gov.in या वेबसाईटवर नव्याने सुरू
करण्यात आलेल्या सारथी 4.0 या प्रणालीव्दारे नागरिकांना अपॉईन्टमेंट घ्यावी लागणार
आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment