09 June, 2017

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली दि. 9 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दि. 10 जून, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
शनिवार दि. 10 जून, 2017 रोजी सकाळी 09.00 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 ते दुपारी 04.00 वाजता हिंगोली जिल्ह्यातील सर्व विभागांच्या कामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. सायंकाळी सोईनुसार हिंगोली येथून शासकीय वाहनाने औंढा-जिंतूर-जालना-औरंगाबाद-अहमदनगर मार्गे पुणेकडे प्रयाण.

***** 

No comments: