सोमवारी जिल्हास्तरीय महिला
लोकशाही दिनाचे आयोजन
हिंगोली, दि. 17 : राज्यघटनेने प्रत्येक
नागरिकाला समान हक्क, व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे.
त्या अंतर्गत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ
मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी
व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून जिल्हा स्तरावर मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली
त्यांचे दालनात दि. 19 जून, 2017 रोजी
सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही दिन होणार आहे. ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात मध्यवर्ती प्रशासकीय
इमारत हिंगोली यांचे कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment