08 June, 2017

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 8 : राज्याचे पर्यावरण मंत्री मा. श्री. रामदास कदम हे दि. 09 व 10 जून, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे असणार आहे.
पर्यावरण मंत्री श्री. रामदास कदम हे शुक्रवार, दि. 09 जून, 2017 रोजी सायंकाळी 06.00 वाजता शासकीय वाहनाने नांदेड येथून हिंगोली जिल्ह्याकडे प्रयाण. रात्री 08.15 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. शनिवार, दि. 10 जून, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता हिंगोली, वसमत, कळमनुरी विधानसभा चर्चेसाठी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे राखीव. दुपारी 12.00 वाजता राखीव. दुपारी 12.45 वाजता शासकीय वाहनाने जिल्हा परभणीकडे प्रयाण.

*****

No comments: