विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑफलाईन
अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली,
दि. 22 : सन 2017-18 या
शैक्षणिक वर्षाकरिता मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे प्रवेश सन 2015-16 च्या
पुर्वीप्रमाणेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात
कार्यरत मागासवर्गीय मुलां/मुलींचे शासकीय वसतिगृहातील प्रवेश ऑफलाईन (मॅन्युअली)
पध्दतीने करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील समाज कल्याण
विभागाच्या सर्व शासकीय वसतिगृहावर सन 2017-18 च्या प्रवेशाकरिता भरावयाचे अर्ज
मोफत वाटप सुरू असून सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही होणार असल्याने
जिल्ह्यातील सर्व पात्र मागासवर्गीय विद्यार्थी / विद्यार्थीनींनी आपला प्रवेश
ज्या तालुक्यात आहे, त्या तालुक्यातील मागासवर्गीय मुलां/मुलींचे शासकीय वसतिगृहात
प्रवेशासाठी ऑफलाईन (मॅन्युअली) अर्ज भरण्याकरिता प्रत्यक्ष वसतिगृहामध्ये जाऊन
अर्जांचा नमुना प्राप्त करून घ्यावा व त्या विहित अर्जांच्या नमुन्यात आपला अर्ज
विहित मुदतीत आवश्यकत्या कागदपत्रासह आपला अर्ज त्याच वसतिगृहात सादर करून त्याची
पोच-पावती त्याच वसतिगृहातून प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक
आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment