आदिवासी विद्यार्थ्यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय
स्वयम योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 14 : राज्यात विभागीय, जिल्हा, तालुका व
ग्रामीणस्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी
आदिवासी विकास विभागाव्दारे शासकीय वसतीगृह योजना कार्यान्वीत आहेत. तसेच विभागीय
व जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात
प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय
स्वयम योजना सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून आदिवासी विभागाव्दारे लागु केली
आहे.
सन
2017-18 या शैक्षणिक वर्षात विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे
शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी / विद्यार्थींनींनी शासकीय
वसतीगृह, अथवा पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयम योजना यापैकी कोणत्याही एक योजनेची
निवड करुन दि. 13 जून, 2017 पासून किंवा त्या त्या अभ्यासक्रमाचे निकाल
लागल्यापासून 01 (एक) महिन्याचे आत swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळाव्दारे
ऑनलाईन अर्ज नोंदणी करावयाची आहे.
विभागीय
व जिल्हास्तरावर इयत्ता 11 वी व 12 वी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तालुका
व ग्रामीण स्तरावर इयत्ता 08 वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तालुका
व ग्रामीण स्तरावर इयत्ता 08 वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या नवीन व जुने
प्रवेशार्थींनी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व नमुद संकेतस्थळाव्दारे ऑनलाईन अर्ज
नोंदणी करावयाची आहे.
वर
नमुद केल्याप्रमाणे ऑनलाईन प्रणालीव्दारे विभागांतर्गत शासकीय वसतीगृहात
प्रवेशासाठी अर्ज नोंदणी केलेल्या नवीन व जुने प्रवेशार्थींनी आवश्यक कागदपत्र
ऑनलाईन अपलोड करुन संबंधीत वसतीगृहाचे गृहपाल यांचेकडे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे
आहे. स्वयम योजनेसाठी नवीन व जुने प्रवेशार्थीनी दि. 13 जून, 2017 पासून किंवा
त्या त्या अभ्यासक्रमाचे निकाल लागल्यापासून एक महिन्याचे आत वर नमुद संकेत
स्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करुन आवश्यक कागदपत्र अपलोड करून अर्ज संबंधीत
वसतीगृहाचे गृहपाल यांचेकडे सादर करावयाचे आहे. अर्ज नोंदणीसाठी मार्गदर्शक सूचना
(युझर मॅन्युअल) वर नमूद संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
तरी
वर नमूद योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर
तात्काळ संपर्क साधून ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी काही
अडचणी आल्यास त्यासाठी नजीकचे वसतीगृहाचे गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा, असे
आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment