जिल्हास्तर युवक-युवती पुरस्कारासाठी
प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 29 : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर विविध विषयांत युवांनी पार पाडलेल्या भूमिका,
योगदान यामुळे युवांची एक अव्दितीय समूह अशी
ओळख समाजात निर्माण झालेली आहे. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील आवश्यक भाग आहे. महाराष्ट् राज्याचे क्रीडा धोरण 2012 च्या अनुषंगाने धोरणातील शिफारशीच्या अनुषंगाने जिल्हा,
राज्य, राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 ते 35 वयोगटातील
युवक - युवती यांना जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील
पुरस्काराचे स्वरूप युवक व युवतींसाठी रोख रक्कम रु.10 हजार व गौरवपत्र, सन्मानचिन्ह
असणार आहे.
विहीत
अर्ज पात्रतेचे निकष व अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली या
कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी केले आहे. अर्ज प्राप्त करून घेणे व जमा करणेची
अंतिम तारीख दि. 10 जुलै, 2017 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
*****
No comments:
Post a Comment