01 June, 2017

जून महिना हिवताप प्रतिरोध म्हणून साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 31 :  राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना जून 2017 या महिन्यात हिवताप व इतर किटकजन्य आजाराविषयी (डेंगू, चिकुनगुनीया, जे.ई., चंडीपुरा, हत्तीरोग इत्यादी) जनतेमध्ये जागृती निर्माण होणे. तसेच त्याचा प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अंमलबजावणी मध्ये सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाव्दारे हिवताप प्रतिरोध महिना पारेषण काळापूर्वी म्हणजे जून महिण्यात साजरा करण्यात येतो. या जनजागरण मोहिमेमध्ये गांव पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिबंधात्मक विविध उपाय योजनाची माहिती योग्य त्या माध्यमाव्दारे पोहचविणे आवश्यक आहे. डासोत्पत्ती प्रतिबंध उपाय योजनामध्ये सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्व्हेक्षण, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्व्हेक्षण, ग्रामीण आरोग्य पोषण आहार समितीची सभा, सर्व स्तरावरुन स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, बचत गटाच्या सभा, शिक्षकासाठी सामाजिक जाणीव, सर्वस्तरावरील अधिकाऱ्यानी फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व एक दिवस कोरडा दिवस पाळणे या विषयी जनजागृती जनतेमध्ये निर्माण करणे.
तरी हिंगोली जिल्हा अंतर्गत सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोकसहभाग घेऊन गांवपातळीवरील सदरील हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रतिज्ञा
मी शहराचा/गांवाचा
शहर/गांव माझे
शहराचे/गांवाचे आरोग्य चांगले ठेवणे,
आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.
याची मला जाणीव आहे.
स्वच्छ शहर/गांव, निरोगी शहर/गांव
मी शहरात/गांवात पाण्याची डबकी साचवु देणार नाही,
अशी डबकी वेळीच बुजवेन.
मोठ्या पाण्यासाठ्यात गप्पी मासे सोडण्यासाठी प्रयत्न करेन,
खिडक्याना डास प्रतिबंधक जाळ्या बसवेन,
झोपताना मच्छरदाणीचा वापर करेन,
डासापासून खबरदारी घेण्यासाठी इतरांनाही सांगेन,
घरावरील पाणीसाठ्याना व्यवस्थीत झाकून ठेवेन,
दर आठवड्याला घरातील पाण्याची मोठी भांडी रिकामी करेन,
स्वच्छ करेन, गुराचे गोठे स्वच्छ ठेवेन,
घराभोवती तसेच परिसरात टायर्स, प्लास्टीक वस्तु तसेच इतर निरुपयोगी वस्तु
साठणार नाही यांची दक्षता घेईन,
हे सारे करण्यात माझे आणि माझ्या शहराचे/गांवाचे हित सामावलेले आहे.
या छोट्या-छोट्या गोष्टीमुळे डासाची पैदास थांबेल.
डास आपल्याला चावणार नाहीत आणि मग डासामुळे होणारे हिवताप,
डेंगू, चिकुणगुणीया, हत्तीरोग, जपाणी मेंदूज्वरासारखे आजारही होणार नाहीत.
शहर/गांव रोगराई मुक्त होणे म्हणजेच शहराला/गांवाला आरोग्य स्वराज्य मिळणे होय.
आपले आरोग्य, आपल्या हाती
आपण रोखु, रोगाच्या साथी

                                                            *****   

No comments: