17 June, 2017

अपंगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण
हिंगोली दि. 17 : महाराष्ट्र शासन, अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ अपंगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई ची शासन मान्यता आहे. तसेच MS-CIT या संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 हा प्राप्त झालेला आहे. सन 2017-18 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे.
प्रवेशासाठी नियम, अटी व सवलती पुढीलप्रमाणे असणार आहे. अभ्यासक्रमाचे नाव : अ) सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) किमान इ. 8 वी पास 25 जागा, ब) सबमर्सिबल सिंगल फेज, थ्री फेज मोटर अँड आर्मेचर रिवायडींग किमान इ. 9 वी पास 25 जागा, क) एम.एस.सी.आय.टी (MS-CIT) वरील सर्व 50 विद्यार्थ्यांसाठी. वयोमर्यादा : 16 ते 40 वर्षे, प्रशिक्षण कालावधी : 1 वर्षे, फक्त अपंग मुलांनाच प्रवेश दिला जातो, सोई व सवलती: प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय. अद्यावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा. भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण. नेटवर्किंग व इंटरनेटची सुविधा. अनुभवी व तज्ञ निदेशक. उज्वल यशाची परंपरा. समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना. अर्ज केंव्हा, कसे व कोठे करावेत : प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिनकोड 416410 फोन नंबर 0233-2222908 मोबाईल 9922577561 / 9975375557 या पत्यावर पोष्टाव्दारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे 31 जुलै, 2017 पुर्वी पोहचतील अशा बेताने पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीव्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.
तरी माफक जागा असल्याने गरजू अपंगांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा. ग्रामीण व शहरी भागातील लोकांना आवाहन करणेत येते की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणांस ज्ञात असलेल्या गरजू अपंग बांधवाना या शासकीय योजनेची माहिती करून द्यावी असे अधिक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज जि. सांगली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

No comments: