अनुसूचित जातीच्या प्रवर्गाकरिता संगणक
दुरुस्ती व निगा
प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि. 13 : स्थानिक आखाडा बाळापूर व कळमनुरी तालुक्यातील
अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गाकरिता विशेष घटक योजने अंतर्गत युवक युवतीसाठी
संगणक दुरूस्ती व निगा या विषयावरील एक महिना कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन
करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र, (एम.सी.ई.डी) हिंगोली व्दारा आयोजीत करण्यात येत आहे या
कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे.
सदरील
कार्यक्रमात संगणक दुरुस्ती व निगा याचे नियोजन कसे करावे, मदर बोर्ड, असेंब्मलींग
व निगा विविध प्रकारचे संगणक दुरुस्ती या प्रकारचे अनेक तांत्रिक प्रात्यक्षिक
रित्या प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास,
शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली, आदीबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून
मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात महिला व युवतींना प्रवेश
घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 45, शिक्षण 7 वी पास, शिक्षण सुरू नसावे.
जातीचे प्रमाणपत्र नॅशनल बँकेचे पासबुक झेरॉक्स आवश्यक आहे. प्रवेशाची अंतिम तारीख
दि. 14 जून, 2017 च्या दुपारी 4 वाजेपर्यंत संदीप खाडे मो. 9657665405 कार्यक्रम
आयोजक एमसीईडी व्दारा सिध्दीविनायक कॉम्प्युटर सेंटर आखाडा बाळापूर ता. कळमनुरी
जि. हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा या कार्यक्रमाच्या दि. 15
जून, 2017 रोजी सकाळी 12.00 वाजता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे आवाहन
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे
प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment