21 जून रोजी
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
हिंगोली दि. 19 : संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषीत
केलेला आहे. 5 हजार वर्षाहून अधिक परंपरा असणारी योगविद्या ही भारताने जगाला
दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या सहाय्यभुत
आहे. तिसऱ्या जागतिक योगदिनाचे आयोजन हिंगोली येथे दि. 21 जून, 2017 रोजी शांताबाई
मुंजाजी दराडे विद्यालय, हिंगोली येथे सकाळी 6.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते
दिपप्रज्वलन करून योगदिनाची सुरुवात करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय
योगदिनाच्या निमित्ताने योगदिनास सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व क्रीडा
प्रेमी, योग साधक, अधिकारी, कर्मचारी, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, विविध खेळ
संघटना, सामाजिक संघटना, युवक संघटना, शाळा, महाविद्यालय यांना आवाहन करण्यात येत
आहे की, त्यांनी या योगदिनानिमित्त मोठ्या प्रमाणात सहभागी होवून या योगदिनाचा लाभ
घ्यावा. या योगदिनामध्ये सर्वांसाठी योग, योगाचे महत्व, आरोग्यसाठी योग
प्रात्यक्षिकासह आयोजन करण्यात येणार असून तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शनही
लाभणार आहे.
दि. 21 जुन 2017
रोजी सकाळी 6.30 वाजता श्रींमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय,
हिंगोली येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सर्वांनी उपस्थित राहून या
आंतरराष्ट्रीय योगदिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक डि. आर.
चवणे व जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र
पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment