भूकंपाचे धक्के
बसणाऱ्या गावात 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत
भूकंप आपत्ती
व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन
हिंगोली, (जिमाका) दि. 27 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्ह्यातील
भूकंपाचे धक्के बसणाऱ्या 35 गावात आणि हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ या 4 तहसील
कार्यालयात असे एकूण 39 ठिकाणी दि. 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत सकाळी
10.00 ते दुपारी 1.00 व दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 या दोन सत्रात भूकंप आपत्ती व्यवस्थापन
कार्यशाळा/प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
दि. 27 सप्टेंबर, 2021 रोजी
सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. या कालावधीत तहसील कार्यालय, औंढा नागनाथ येथे तर दुपारी
2.00 ते 5.00 वा. या तहसील कार्यालय, वसमत येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत तहसील कार्यालय, हिंगोली
येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत तहसील कार्यालय, कळमनुरी येथे, दि. 29 सप्टेंबर
रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सिंदगी, कळमनुरी येथे तर दुपारी 2.00 ते
5.00 वाजेपर्यंत जांब, कळमनुरी येथे, दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी
1.00 वाजेपर्यंत बोल्डा, कळमनुरी येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत येहळेगाव
ग., कळमनुरी येथे, दि. 01 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सापळी,
कळमनुरी येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत डोंगरगाव, कळमनुरी येथे, दि. 02 ऑक्टोबर
रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कुपटी, कळमनुरी येथे तर दुपारी 2.00 ते
5.00 वाजेपर्यंत गणगाव, कळमनुरी येथे, दि. 03 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी
1.00 वाजेपर्यंत भोसी, कळमनुरी येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत तोंडापूर, कळमनुरी
येथे, दि. 04 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत येडशी, कळमनुरी येथे
तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत पोत्रा, कळमनुरी येथे, दि. 05 ऑक्टोबर रोजी सकाळी
10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कन्हेरगाव नाका, हिंगोली येथे तर दुपारी 2.00 ते
5.00 वाजेपर्यंत मोप, हिंगोली येथे, दि. 06 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी
1.00 वाजेपर्यंत कानडखेडा खु., हिंगोली येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत कानडखेडा
बु., हिंगोली येथे, दि. 07 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कलबुर्गा,
हिंगोली येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत चिंचपुरी., हिंगोली येथे, दि. 08 ऑक्टोबर
रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत वाढोणा/प्र., हिंगोली येथे तर दुपारी
2.00 ते 5.00 वाजेपर्यंत लिंबाळा प्र.वा., हिंगोली येथे, दि. 09 ऑक्टोबर रोजी सकाळी
10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कापूरखेडा, हिंगोली येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत
भिंगी, हिंगोली येथे, दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत पिंपळदरी,
औंढा नागनाथ येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत राजदरी, औंढा नागनाथ येथे, दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00
वाजेपर्यंत सोनवाडी, औंढा नागनाथ येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत आमदरी, औंढा
नागनाथ येथे, दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत जामगव्हाण,
औंढा नागनाथ येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत कंजारा, औंढा नागनाथ येथे, दि.
13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत पूर, औंढा नागनाथ येथे तर दुपारी
2.00 ते 5.00 वाजेपर्यंत आंबा, वसमत येथे, दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी
1.00 वाजेपर्यंत सिरळी, वसमत येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत राजवाडी, वसमत
येथे, दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत पांगरा शिंदे,वसमत
येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत वापटी, वसमत येथे, दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी
10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कुपटी, वसमत येथे तर दुपारी 2.00 ते 5.00 वाजेपर्यंत
खांबाळा, वसमत येथे आयोजित करण्यात आले आहे,
तहसील कार्यालयातील प्रशिक्षणास
तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, नायब तहसीलदार, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी,
ग्रामसेवक आदींना हजर राहण्याबाबत तहसीलदारांमार्फत सूचित करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण
तहसील कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे.
गावातील प्रशिक्षणासाठी मंडळ
अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना हजर राहण्यासाठी तहसीलदारांमार्फत सूचित करण्यात येणार
आहे. या प्रशिक्षणात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस
पाटील, सर्व समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, आशा वर्कर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका,
नागरिक इत्यादीं उपस्थित राहणार आहेत. तसेच झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची स्थानिक
वृत्तपत्रामार्फत प्रसिध्दी देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
ग्रामसेवक व तलाठी यांनी प्रशिक्षकांमार्फत
देण्यात येणारा गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो आराखडा ग्रामपंचायत कार्यालयात,
तहसील कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना
दिलेल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
दिली आहे.
****
No comments:
Post a Comment