रेशीम शेती प्रशिक्षणाचे उद्घाटन संपन्न
हिंगोली
(जिमाका), दि. 02 : जिल्हा
रेशीम कार्यालय व एस.बी.आयच्या जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण
संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार
प्रशिक्षण (आरसेटी) संस्थेमध्ये जिल्ह्यातील
रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी दि.31 ऑगस्ट, 2021 ते
9 सप्टेंबर, 2021 या कालावधीत रेशीम
शेती या विषयावर निवासी तांत्रिक उद्योजकता
प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात
आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन आज जिल्हा रेशीम विकास अधिकारी
स्वप्नील तायडे , एस.बी.आय आर.से.टी
चे संचालक
श्री.बोईले व जिल्हा रेशीम कार्यालयाचे
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
अशोक वडवळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक
सहाय्यक अशोक वडवळे यांनी रेशीम
शेती हा पारंपारिक शेतीला उत्तम
जोडधंदा असून शेतकऱ्यांनी
स्वत:चा उत्कर्ष साधून घेण्यासाठी रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारावा,
असे आवाहन केले. तर जिल्हा
रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे
यांनी जिल्हयातील
शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा
स्वीकार करुन आपले उत्पन्न दुप्पट
करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत
रहावे,
असे आवाहन केले.
या प्रशिक्षणाला जिल्हयातील तोंडापुर,
आंबा, आरळ, चुंचा व करंजी
येथील 35 शेतकरी उपस्थित
आहेत. या सर्वांना पुढील 10
दिवस निवासी प्रशिक्षण
देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामधे
रेशीम शेती विषयाचे तांत्रिक मार्गदर्शन
तसेच उद्योजकता विकास
या बाबतीत
सखोल मार्गदर्शन केले
जाणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत जिल्हा रेशीम कार्यालयाचे
रमेश भवर, शिलवंत इंगोले, रंगनाथ
जांबुतकर, रजनीश कुटे, तान्हाजी परघणे
हे
मार्गदर्शन करणार आहेत.
*****
No comments:
Post a Comment