सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे
19 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
हिंगोली, (जिमाका) दि. 17 : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे हे दि. 19 सप्टेंबर, 2021 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 19 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता जालना येथून निघून 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन करतील. 11.00 वाजता कोथळज रोड हिंगोली येथील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 12.00 वाजता लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटलला भेट. अकोला रोड हिंगोली येथील माधव हॉस्पिटलच्या सिटी स्कॅनचे उद्घाटन. 12.30 वाजता हॉटेल शिवलिला पॅलेस हिंगोली येथे राखीव. दुपारी 1.00 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट. 2.15 वाजता जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथील दुर्गा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन. 2.45 वाजता जवळा बाजार येथून जालनाकडे प्रयाण .
*****
No comments:
Post a Comment