रस्ते अपघातग्रस्तांना
मदत करणाऱ्या सेवाभावी संस्था, व्यक्तींनी
पुरस्कारासाठी अर्ज
करण्याचे आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि. 28 : देशातील रस्ते अपघात एक गंभीर समस्या आहे. या अपघातामध्ये लोक
गंभीररित्या जखमी होतात, तर काहींना जीव गमवावे लागते. रस्ते अपघातातील जखमी
व्यक्तींना तात्काळ मदत मिळावी यासाठी सेवाभावी संस्था तसेच व्यक्ती (Good
Samaritans) सतत कार्यरत असतात. Morth यांच्या दि. 29 सप्टेंबर, 2020 च्या
अधिसुचनेनुसार Good Samaritans चे नियम अधिसूचित केले आहे. रस्ते अपघातग्रस्तांना
मदत करणाऱ्या सेवाभावी संस्था तसेच व्यक्तींना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.
अशा लोकांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व
महामार्ग मंत्रालयाकडून नामांकन मागविण्यात आलेले आहे.
अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ मदत
केलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सेवाभावी संस्था तसेच व्यक्तींनी विहित प्रपत्रात
माहिती भरुन दि. 29 सप्टेंबर, 2021 पर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली
यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
****
No comments:
Post a Comment