मराठवाडा मुक्तीसंग्राम
दिनाच्या कार्यक्रमात
संबंधित विभागाने आपणास
दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली, (जिमाका) दि. 08 : येत्या 17 सप्टेंबर रोजी 73 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जाणार
आहे. याप्रसंगी आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे प्रतिपादन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त
ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
सभागृहात आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी
अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी
माध्यमिक परशुराम पावसे, शिक्षणाधिकारी प्राथमिक संदीपकुमार सोनटक्के, तहसीलदार
संदीप राजपुरे आणि सर्व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा
पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम 17
सप्टेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता देवडा नगर
येथील नगर परिषद उद्यानात उभारलेल्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन केला
जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रम
कोरोनाविषयक नियमावलीचे पालन करुन पार पाडण्यात येणार आहे.
कार्यक्रम स्थळी नागरिकांच्या आसनाची
व्यवस्था, परिसर स्वच्छता, आणि सॅनिटायझेन करण्याची जबाबदारी नगर परिषदेची असेल.
लाऊड स्पीकर व शामियाना लावण्याबाबत कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने तर
विद्युत विभागाने त्या दिवशी विज पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. तसेच
कार्यक्रमस्थळी आरोग्य पथक आणि रुग्णवाहिका तत्पर असणे अपेक्षित असल्याचेही
जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी सांगितले.
****
No comments:
Post a Comment