आदिवासी शेतकऱ्यांनी
शेळीगट पुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे
हिंगोली, (जिमाका) दि. 27 : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत अनुसूचित जमातीच्या वनहक्क
कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीस पूरक
व्यवसाय म्हणून वैयक्तीक योजनेतून शेळीगट पुरवठा करावयाचा आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून
अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली या कार्यालयात उपलब्ध आहेत.
इच्छूक लाभार्थ्यांनी प्रकल्प
अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्या नावे योजनेचा
लाभ घेण्यासाठी वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणारा आदिवासी शेतकरी असावा.
वनपट्टे प्राप्त झाल्याबाबतचे प्रमाणपत्र व सातबारा उतारा असणे आवश्यक आहे. अनुसूचित
जमातीचे जातीचे प्रमाणपत्र, सन 2021 या वर्षातील उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र
(स्वयंघोषित), आधार कार्ड छायांकित प्रत, आधार जोडणी असलेले अर्जदाराचे बँक पासबूक,
अर्जदाराचे पासपोर्ट साईज दोन फोटो याप्रमाणे परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज दि. 14 ऑक्टोबर,
2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज व परिपूर्ण नसलेले
अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
कळमनुरी जि. हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment