19 September, 2021

 जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही  

तर 03 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 19 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 33 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 637  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज घडीला जिल्ह्यात 03 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 393 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

No comments: