जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही
रुग्ण नाही, तर 03 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
03 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली,
(जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह
रुग्ण आढळून आले नाही, तर 03 कोविड-19
रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 03 कोविड-19
पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र
सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार
38 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 641 रुग्ण
बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 03
कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर
उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा
मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले
आहे.
*******
No comments:
Post a Comment