जिल्ह्यात
कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 04 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली,
(जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही, तर 04 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर
उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज
दिली आहे.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार 36
रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 638 रुग्ण
बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 04
कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात
आतापर्यंत 394 व्यक्तींचा
मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले
आहे.
*******
No comments:
Post a Comment