आरोग्य यंत्रणेने चांगले काम
केल्यामुळेच जिल्हाची कोरोनामुक्तिकडे वाटचाल
- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड
- वसमत
येथील महिला रुग्णालयाच्या औषधी भांडारगृह व वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचा
पायाभरणी समारंभ पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते संपन्न.
हिंगोली,
(जिमाका) दि. 16 : महिला रुग्णालयामुळे वसमत तालुक्यासह जवळच्या इतर तालुक्यातील
महिंलावर उपचार करण्यासाठी मोठी सोय झाली असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे
प्रतिपादन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले.
वसमत
येथील महिला रुग्णालयाच्या औषधी भांडारगृह व वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाच्या
पायाभरणी समारंभ पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी
त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री जयप्रकाश
दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, नगराध्यक्ष श्रीनीवास पोरजवार, संजय बोंढारे,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम
भोरगे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री
प्रा. वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी
सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे व माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुखांचे
मराठवाड्यावर प्रेम असल्यामुळे वसमत येथे महिला रुग्णालय सुरु करण्यास मान्यता
दिली होती. या रुग्णालयाच्या औषधी भांडारगृह व वैद्यकीय अधीक्षक कार्यालय
इमारतीच्या माध्यमातून रुग्णांची सोय होणार आहे. जिल्ह्यात आरोग्याच्या
दृष्टिकोनातून कोरोनाकाळात खूप चांगले काम झाले आहे. आरोग्य यंत्रणेने चांगले काम
केल्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्तिकडे वाटचाल करीत आहे. यासाठी त्यांनी यावेळी
आरोग्य व्यवस्थापनाचे व पोलीसांचे आभार मानले.
निजामकालीन
शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाने 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या
निधीतून व लोकसहभागातून मॉडेल स्कूलची
संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्रातील 472 शाळा निवडल्या
आहेत असे पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
यावेळी
बोलतांना आमदार राजू नवघरे यांनी महिला रुग्णालयामुळे वसमतसह जवळच्या तालुक्यातील
महिलांना याचा लाभ होत आहे. येथे महिण्याला 200 ते 250 प्रसृती होत असतानाचे
सांगतांना त्यांनी रुग्णालयाच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी लाईटची व पाण्याची
व्यवस्था करण्याची मागणी केली. या
कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पोत्रे,
यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरीक पदाधिकारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment