जिल्ह्यात
कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही
तर
02 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
हिंगोली,
(जिमाका) दि. 09 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 02 रुग्ण बरे झाल्याने
त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र
सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार 29
रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 637 रुग्ण
बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात
आतापर्यंत 392 व्यक्तींचा
मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले
आहे.
*******
No comments:
Post a Comment