14 September, 2021

 

पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा हिंगोली दौरा

 

हिंगोली, (जिमाका) दि. 14 :  राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड ह्या दि. 16 व 17 सप्टेंबर, 2021 या दोन दिवसाच्या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे .

गुरुवार, दि. 16 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथून मोटारीने मौ. खांडेगाव, वसमतकडे प्रयाण. 9.30 वाजता वसमत शिवारात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतांची पाहणी, 10.30 वाजता मो. खांडेगाव ता. वसमत येथे विविध विकास कामाचे व आरोग्य शिबिराचे उद्घाटन. दुपारी 12.00 वाजता वसमत येथील महिला रुग्णालयाचा पायाभरणी कार्यक्रम. 1.00 वाजता वसमत शहरातील काँग्रेस पक्ष शाखेचे  उद्घाटन, 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह वसमत येथे महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच्या भेटी, 2.00 ते 2.30 वाजता आमदार श्री. चंद्रकांत नवघरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. 3.00 वाजता वसमत येथून मोटारीने सिध्देश्वर ता. औंढाकडे प्रयाण. सायंकाळी 4.00 वाजता सिध्देश्वर ता. औंढा नागनाथ येथे आगमन करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण कामाचे उद्घाटन, मौ. धार रुपूर सिध्देश्वर रस्ता उद्घाटन, पर्यटन क्षेत्र विकास कामांचे उद्घाटन, माजी मंत्री श्री. जयप्रकाशजी दांडेगावकर यांची राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली आणि इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लि. येथे निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार. सायंकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह औढा नागनाथकडे मोटारीने प्रयाण. 5.20 वाजता शासकीय विश्रामगृह औंढा नागनाथ येथे आगमन व सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, हिंगोलीकडे प्रयाण.

शुक्रवार, दि. 17 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 8.40 वाजता मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना सलामी व पुष्पचक्र अर्पण कार्यक्रमास उपस्थिती. 9.00 वाजता हुतात्मा स्मारक, देवडा नगर, हिंगोली येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. 11.00 वाजता हिंगोली शहरातील बसस्थानकाचे उद्घाटन. दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे अतिवृष्टी व कोविड सद्यस्थितीबाबत जिल्हा प्रशासनासोबत बैठक. दुपारी 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून मोटारीने जवळा बाजार ता.औंढाकडे प्रयाण. 2.40 वाजता श्री. मुनीर पटेल, जवळा बाजार, ता.औंढा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 3.30 वाजता जवळा बाजार येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, परभणीकडे प्रयाण.

*****

No comments: