13 July, 2023

 

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला

मागील प्रलंबित नस्तीसाठी 22.21 कोटी रुपयाचा निधी प्राप्त

लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट देण्याचे महामंडळाचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 :  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची स्थापना 01 मे, 1974 रोजी कंपनी अधिनियम 1956 अन्वये अनुसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार,ढोर, होलार, मोची इत्यादी) यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यासाठी करण्यात आली आहे. महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या (एन.एस.एफ.डी.सी.) योजना राबविण्यात येत असून 4800 लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.  यामध्ये एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेंतर्गत स्मॉल बिझनेस एक लाख रुपये, दीड लाख रुपये व दोन लाख रुपये, चर्मोद्योग दोन लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी 50 हजार रुपये या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तीसाठी 22.21 कोटी रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे.

तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सी. यांच्या मुदती कर्ज योजनेंतर्गत स्मॉल बिझनेस        5 लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी 1.40 लाख रुपये तसेच नवीन महिला अधिकारीता योजना 5 लाख रुपये  मंजूर झालेल्या आहेत. तर एन.एस.एफ.डी.सी. यांच्या शैक्षणिक कर्ज योजनमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये 20 लाख रुपये व विदेशामध्ये 30 लाख रुपयापर्यंत कर्ज मंजुर करण्यात येईल. लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट देण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादीत मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

**** 

No comments: