वेतन पडताळणी पथकाचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली (जिमाका), दि. 20 : सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सेवा पुस्तकांची वेतन पडताळणी करण्यासाठी वेतन पडताळणी पथक
दि. 24 व 25 जुलै, 2023 रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहे.
हे पथक
दि. 24 व 25 जुलै, 2023 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहून
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सेवा पुस्तकाची वेतन पडताळणी करणार आहे. या वेतन
पडताळणी पथकाच्या दौऱ्यात दिनांक 01 जानेवारी, 2019 नंतर सेवानिवृत्त झालेले तसेच दिनांक 31
डिसेंबर, 2030 पर्यंत सेवानिवृत्त होणारे अधिकारी, अधिकारी तसेच न्यायालयीन, मयत,
लोकायुक्त प्रकरणे यांच्या सेवापुस्तकास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच
सेवापुस्तक शासन निर्णय परिपत्रक वित्त विभाग दि. 20 जानेवारी, 2001 सोबतचे
जोडपत्र (चेक लिस्ट) प्रमाणे परिपूर्ण पूर्तता करुन जोडपत्र सेवापुस्तकात जोडणे
आवश्यक आहे. तसेच सेवापुस्तके पडताळणीसाठी दाखल करतांना शासन निर्णय वित्त विभाग
14 मे, 2019 अन्वये वेतनिका प्रणालीमार्फत वेतन पडताळणी पथकाकडे तपासणीसाठी सादर
करावयाची आहेत. सेवाजेष्ठतेनुसार मिळालेली प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली असल्यास
तसेच कालबध्द, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी
त्यानंतर प्रत्यक्ष दिलेली पदोन्नती नाकारली असल्यास त्याबाबतची नोंद मुळ सेवा
पुस्तकामध्ये घेणे आवश्यक आहे. यानुसार सर्व नोंदी मूळ सेवापुस्तकात घेऊन सातव्या
वेतन आयोगाप्रमाणे सेवापुस्तकाची वेतन पडताळणी करण्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा,
असे आवाहन सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment