दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व
व्यावसायिक प्रशिक्षण
गरजू दिव्यांगानी लाभासाठी संपर्क
साधण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा
परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतीगृह ही
संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय
संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण
व प्रशिक्षण मंडळ मुंबईची शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील एफआयसीसीआय
ॲवार्ड-1999 हा प्राप्त झालेला आहे. सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षासाठी सटीफिकेट
इन कॉम्प्यूटर ऑपरेशन वुईथ एमएस ऑफिस हा संगण कोर्स व मोटार अँड आमेंचर वायडींग, सबमर्सिबल
पंप सिंगल फेज हा इलेर्क्ट्रीक कोर्स या दोन कोर्ससाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे.
प्रवेशासाठी नियम, अटी व सवलती : संगणक कोर्ससाठी किमान शैक्षणिक पात्रता 8 वी पास असणे
आवश्यक आहे. तर इलेक्ट्रीक कोर्स साठी किमान शैक्षणिक पात्रता 9 वी पास असणे आवश्यक
आहे. वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा
आहे. यासाठी फक्त दिव्यांग मुलानांच प्रवेश दिला जातो. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची,
जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स
व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक,
उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी, व्यवसायासाठी बीज भांडवल
योजना इत्यादी सोयी सवलती आहेत.
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण
केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता.मिरज जि. सांगली
पिनकोड-416410, दूरध्वनी क्र. 0233-2222908, मोबाईल क्रमांक 9922577561,
9595667936 या पत्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही
फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा
समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी मार्कशीट व प्रमाणपत्र,
अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, युडीआयडी कार्ड, डोमिसाईल
प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती अर्जासोबत जोडून प्रवेश अर्ज
संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन
प्रवेश देण्यात येईल.
माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगानी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी
त्वरित संपर्क साधावा. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी
आपणास ज्ञात असलेल्या गरजू दिव्यांग बांधवाना या शासकीय योजनेची माहिती द्यावी, असे
आवाहन अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज ता.मिरज जि.सांगली
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment