टॅब लॉक करण्यासबंधीच्या अपप्रचारांना बळी पडू नये :
महाज्योतीचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 04 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती), नागपूर मार्फत महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त
जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांना जेईई/नीट/एमएचटी-सीईटी परीक्षा प्रशिक्षणासाठी
मोफत टॅब वाटप ही माहाज्योतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत दररोज 6 जीबी
डेटा देण्याचाही समावेश आहे.
विद्यार्थ्यांना 2023 च्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी
परीक्षा प्रशिक्षणा करीता मोफत टॅब वितरित करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी
टॅबचा वापर पुर्णत: अभ्यासाकरीता करावा यासाठी टॅबला एडमिनिस्ट्रेटिव पासवर्ड लावण्यात
आला होता. दिनांक 6 जून 2023 रोजी सदर विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपल्याने टॅबमधील
एडमिनिस्ट्रेटिव पासवर्ड अनलॉक करण्याकरीता सबंधीत कंपनीला कळविण्यात आले असल्याने
विद्यार्थ्यांनी याबाबत कोणताही संभ्रम किंवा गैरसमज बाळगू नये असे महाज्योतीतर्फे
आवाहन करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment