जुलै अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र
31 जुलै पर्यंत सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 14 : सर्व शासकीय, निमशासकीय
कार्यालये तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची
माहितीबाबतचे माहे जून,2023 अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर
दि. 31 जुलै, 2023 पर्यंत ऑनलाईन भरावेत. माहे जुलै, 2023 ची मासिक वेतन देयके
दाखल करताना ईआर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे.
याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व
संबंधितांनी नोंद घ्यावी.
तसेच सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,हिंगोली
या कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत.
त्यानुसार सर्व कार्यालयानी आपला
ई-मेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, टॅन क्रमांक, पॅन क्रमांक टाकून
आपली प्रोफाईल अपडेट करावी, असे आवाहन सहायक आयुक्त , कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment