10 July, 2023

 शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी

13 जुलै रोजी जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन

                                                                                                             

  हिंगोली (जिमाका), दि.10 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत गुरुवार, दि. 13 जुलै, 2023  रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी ही मोहिम चालू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील खाजगी संस्था, बँक, कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त पदासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना कामाची संधी दिली जाते. जास्तीत जास्त उद्योजकांनी आपली रिक्त पदे या कार्यालयास कळवितात. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी माहिमेचे आयोजन करण्यात येत आहे.

क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. नागपूर (मायक्रो फायनान्स) कंपनीमध्ये ट्रेनी केंद्र मॅनेजरची बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर शैक्षणिक पात्रतेची हिंगोलीचे-14, परभणी-15 जागा पुरुष 19 ते 30 व महिला 19 ते 35 वयोगटातील उमेदवारामधून भरावयाची आहेत. यासाठी स्वत:ची टुव्हीलर आणि लायसन, ई-आधार आवश्यक आहे. या पदासाठी 11 हजार 500 मासिक प्रोत्साहन भत्ता अधिक पेट्रोल भत्ता अधिक वार्षिक बोनस अधिक राहणे फ्री आहे. तसेच मनसा मोटर्स हिंगोली येथील कॉम्प्यूटर ऑपरेटर-3, अकाऊंटंट-2, मेकॅनिक-4, मार्केटींग ऑफिसर-7, सिआरओ-3, शिपाई-2, हेल्पर-3 याप्रमाणे पदे भरावयाची आहेत. ही पदे 18 ते 40 वयोगटातून भरावयाची आहेत. या सर्व पदासाठी वेतन 7 हजार ते 15 हजार पर्यंत असणार आहे.  

या महिन्याच्या गुरुवार दि. 13 जुलै, 2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. (मायक्रो फायनांस) नागपूर व मनसा मोटर्स, हिंगोली या आस्थापना/कंपनीचे उद्योजक उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदवीधर या शैक्षणिक आर्हतेनुसार 50 पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन नोंदणी करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 7972888970 किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

 

*****   

No comments: