फूड प्रोसेसिंग या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन
2 ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि. 31 : येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वसाधारण
प्रवर्गातील युवक व युवतीसाठी फूड प्रोसेसिंग या विषयावर मोफत प्रशिक्षण
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी उमेदवार हा
किमान 8 वी पास असावा, वय 18 ते 45 वर्षे यादरम्यान असावे. तसेच आधार कार्ड,
पासपोर्ट फोटो, टीसी, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 2 ऑगस्ट, 2023
पर्यंत करावेत. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी किसन धावे (मो.9370631461),
कार्यक्रम आयोजक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र,
एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे
आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment