शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगार
उमेदवारासाठी
13 जुलै रोजी जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन
हिंगोली
(जिमाका), दि. 11 : जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत ‘शासन आपल्या दारी’
या कार्यक्रमांतर्गत गुरुवार, दि. 13 जुलै, 2023
रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा
यासाठी जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली
यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी ही मोहिम
चालू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील खाजगी संस्था, बँक, कंपन्यामध्ये असलेल्या
रिक्त पदासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना कामाची संधी दिली जाते.
जास्तीत जास्त उद्योजकांनी आपली रिक्त पदे या कार्यालयास कळवितात. त्यामुळे
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा
माळा, हिंगोली येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी
माहिमेचे आयोजन करण्यात येत आहे.
एसबीआय लाईफ इन्शुरंस, हिंगोली या कंपनीमध्ये
डेव्हलेपमेंट मॅनेजरची पदवी व मार्केटींगचा दोन वर्षाचा अनुभव असलेली 5 पदे 25 ते
40 वयोगटातून भरण्यात येणार आहेत. यासाठी वेतन 20 ते 22 हजार रुपये असणार आहे. फायनांसिअल
ॲडवायझरची दहावी, बारावी शैक्षणिक पात्रतेची 30 पदे 24 ते 50 वयोगटातील उमेदवारामधून
भरावयाची आहेत. यासाठी वेतन 15 ते 20 हजार रुपये कमिशन बेसेसवर असणार आहे. तसेच महिंद्रा
मनसा ट्रॅक्टर्स हिंगोली येथील स्पेअर मॅनेजर-1, रिटेल मॅनेजर-2, अकाऊंटंट-2, मेकॅनिक-4,
मार्केटींग ऑफिसर-7, वॉचमन-3, हेल्पर-3 याप्रमाणे पदे भरावयाची आहेत. ही पदे 18 ते
40 वयोगटातून भरावयाची आहेत. या सर्व पदासाठी वेतन 7 हजार ते 15 हजार पर्यंत असणार
आहे.
या महिन्याच्या गुरुवार दि. 13 जुलै, 2023 रोजी
सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत एसबीआय लाईफ इन्शुरंस, हिंगोली व महिंद्रा
मनसा ट्रॅक्टर्स हिंगोली या आस्थापना/कंपनीचे
उद्योजक उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व
पदवीधर या शैक्षणिक आर्हतेनुसार 50 पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या
संकेतस्थळावर भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन
नोंदणी करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे स्वखर्चाने
उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 7972888970 किंवा 7385924589 या
भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे
आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment