अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज
पाठविण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 14 : अपंग कल्याण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग
प्रशिक्षण केंद्र, देगलूर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा
मंडळ मुंबई मार्फत मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग,
मुकबधीर, मतिमंद मुलामुलींना प्रवेश देण्यात येत आहे.
या प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तनकला,
कॉम्प्यूटर अकाऊंटींग व ऑफिस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेटर इत्यादी
अभ्यासक्रमाना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामूल्य
सोय केलेली आहे.
इच्छूक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुलीमुलींनी
किंवा पालकांनी दि. 31 जुलै, 2023 पर्यंत तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,
देगलूर जि. नांदेड येथे अर्ज पाठवावेत किंवा समक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी
भ्रमणध्वनी क्रमांक 9960900369, 9403207100, 7378641136, 9503078767 वर संपर्क
साधावा, असे आवाहन कर्मशाळा अधीक्षक, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर
जि. नांदेड यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment