राज्य महिला आयोगाच्या सदस्या
ॲड.संगीता चव्हाण यांचा दौरा
हिंगोली (जिमाका), दि.
17 : महाराष्ट्र राज्य
महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण दि. 19 व 20 जुलै, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत आहेत.
श्रीमती चव्हाण ह्या जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये
कार्यरत महिला कामगार यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेणार आहेत. तसेच काही उद्योगांच्या
आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथे कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या
जाणून घेणार आहेत.
*****
No comments:
Post a Comment