09 July, 2023

 

हिंगोली जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेत गेलेल्या नागरिकाचा संपर्क होत नसल्यास

जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

              हिंगोली (जिमाका), दि. 09 : सद्यस्थितीत अमरनाथ येथे खराब हवामान असून दर्शन यात्रेमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तसेच आपत्तीजनक घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन सेवेसाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संपर्क प्रमुख म्हणून रोहित कंजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

             त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9405408939 व 02456-222560 असा आहे. 

             हिंगोली जिल्ह्यातील काही नागरिक अमरनाथ येथे गेले असतील आणि त्यांचा संपर्क होत नसेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

******

No comments: