वर्षपूर्ती निमित्त विशेष लेख
शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान
योजना
भारत हा कृषिप्रधान देश असून, शेती हा
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपल्या राज्यात देखील शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.
परंतू शेतकऱ्यांसमोर आता दिवसेंदिवस शेती कामांसाठी मजुरांचा प्रश्न हा गंभीर होत चालला
आहे. त्यामुळे मजुरां अभावी शेतीची कामात वेळेवर होणे. तसेच त्या शेतीतून मिळणारे उत्पन्न
यामुळे शेती हा व्यवसाय हा खडतर होत आहे. जे शेतकरी बांधव शेतीसाठी आवश्यक यंत्र किंवा
अवजारे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे खरेदी करू शकत नाही. अशा शेतकऱ्यांना आर्थिक
सहाय्य करणे गरजेचे आहे. सन 2023 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे
उद्दिष्ट असून, शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांचा खर्च कमी करून, उत्पादनात वाढ करण्यासाठी
पारंपारिक पद्धतीच्या शेतीत बदल करून आधुनिक पद्धतीने यांत्रिकीकरणाद्वारे आधुनिक शेती
करणे आज काळाची गरज बनली आहे. नवीन यांत्रिकीकरणाचा वापर केल्यास शेतीच्या उत्पादनात
वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे.
याकरीता राज्यात 100 टक्के राज्य पुरस्कृत
कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर योजना 2023 ही योजना राबविण्यास मान्यता दिली आहे.
या योजने मध्ये ट्रॅक्टर व पॉवर टीलर, चलित यंत्र व औजारे पिक संरक्षण साधने, मनुष्य
व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिटस, भाडे तत्वावर कृषि यंत्र व औजारे सेवा पुरवठा
केंद्राची उभारणी इत्यादीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. यात
अत्यल्प व अल्प भुधारक,अनुसूचित जाती/जमाती आणि महिला लाभार्थीना या योजने अंतर्गत
50 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान मिळते.
या कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमातंर्गत
कृषि अवजारे/मशिनरी/उपकरणे खरेदीसाठी पुढीलप्रमाणे अर्थसहाय्य पात्र लाभार्थ्यांना
दिले जाते. यामध्ये ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) साठी रु. 1,25,000/-, तर पॉवर टिलर8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त 85 हजार
रुपये, 8 बीएच पी पेक्षा कमीसाठी 65 हजार रुपये, रिपर कम बाइन्डर (ट्रॅक्टरचलित) 1
लाख 75 हजार रुपये , रिपर कम बाइन्डर 2 लाख 50 हजार रुपये, रोटाव्हेटर 5 फुट 42
हजार रुपये, रोटाव्हेटर 6 फुट 44 हजार 800 रुपये, पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती) 20 हजार रुपये,
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम 70 हजार रुपये, पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम
89 हजार 500 रुपये, पलटी नांगर मेकॅनिकल डबल
बॉटम 40 हजार रुपये, नांगर मेकॅनिकल ट्रिपल
बॉटम 50 हजार रुपये आदी यंत्र सामुग्रीकरीता अर्थसहाय्य देण्यात येते. यासाठी योजनेसाठी
शेतकऱ्यांना पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत. यात आधार कार्ड, सातबारा उतारा व 8अ, लाभार्थी
अनु.जमाती अनु. जाती मधील असल्यास जातीचा दाखला,
ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजाराचा टेस्ट रिपोर्ट परिक्षण अहवाल, बँक पास बुक आणि यंत्राचे कोटेशन आवश्यक आहे. या योजनेचा ऑनलाईन
पद्धतीने अर्ज mahadbt farmer scheme - https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर
भरणे आवश्यक आहे. त्यासाठी लाभार्थी स्वतःच्या मोबाईल/लैपटॉपवर किंवा CSC
center सीएससी सेंटर/ ग्रामपंचायत मधील संग्राम
केंद्र ई माध्यमातून वरील संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.
हिंगोली
जिल्ह्यात या यांत्रिकीकरण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, या योजनेतंर्गत शेती
अवजारे, साहित्य खरेदीसाठी देखील अनुदान मागणी अधिक आहे. सन 2022-23 वित्तीय वर्षात
कृषी यांत्रिकीकरण या घटकातंर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित (रोटावेटर, पेरणी यंत्र,
मळनियंत्र, नांगर, ई.) तसेच स्वयं चलित औजारे याबाबतीत हिंगोली जिल्ह्यात एकूण 1703
लाभार्थ्यांना 9 कोटी 38 लाख 53 हजार
रुपये अनुदान हे डी.बी.टी द्वारे आधार संग्लग्न खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. राज्य
शासनाने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेला जिल्ह्यातील
शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- अरुण सुर्यवंशी
जिल्हा माहिती अधिकारी
हिंगोली
*****
No comments:
Post a Comment