13 July, 2023

 

जिल्हा बाल संरक्षण कक्षाची आणि जिल्हा कृती दलाची आढावा बैठक संपन्न

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 13 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 च्या कलम 106 नुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाची व जिल्हा कृती दलाची कामकाज आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देने यांनी बैठकीतील उपस्थित विभाग प्रमुखांना जिल्ह्यातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना त्यांच्या विभागाशी निगडीत असलेल्या योजनांचा लाभ देण्याबाबत आदेशित केले. तसेच ग्राम बाल संरक्षण समितीच्या ठरावात नव्याने बालमित्र निवडीबाबत बैठकीत सुचना दिल्या.

या बैठकीमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत राबविलेले विविध जनजागृती कार्यक्रम, जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये बाल मित्र निवडी बाबत कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी, जिल्ह्यात चांबविलेल्या बाल विवाहाबाबत. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल, पाठपुरावा, समुपदेशन, अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र, रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या शोध मोहिमेबाबत तसेच जिल्ह्यातील कोविड-19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांनी दिली.

या बैठकीत महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.एल. बोंद्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, माधव सलगर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, विशेष बाल पोलीस पथक अधिकारी, जिल्हा न्यायिक सेवेचे प्रतिनिधी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी, बाल कल्याण समिती अध्यक्ष, सदस्य, बाल न्याय मंडळ सदस्या, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण, रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रीय कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत उपस्थित होते.

****

No comments: