आरओ इलेक्ट्रीशियन ॲन्ड मेंटेनन्स या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे
आयोजन
4 ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि. 26 : येथील जिल्हा उद्योग
केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने हिंगोली तालुक्यातील
सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतीसाठी आरओ इलेक्ट्रीशियन ॲन्ड मेंटेनन्स या
विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी उमेदवार हा किमान 8 वी पास असावा, वय 18 ते 45 वर्षे
यादरम्यान असावे. तसेच आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, बँक पासबूक जमा करुन आपली
नाव नोंदणी दि. 4 ऑगस्ट, 2023 पर्यंत करावेत. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी
सुभाष बोरकर, कार्यक्रम आयोजक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा
उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment