ऑनलाईन शिधापत्रिकासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क अदा करु
नये
जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 04 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या
दि. 16 मे, 2023 च्या शासन निर्णयानुसार शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत राष्ट्रीय
अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यासाठी क्यूआर कोड आधारित ई-शिधापत्रिका ऑनलाईन तसेच
डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय
अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न शिधापत्रिका (AAY), प्राधान्य कुटुंब योजना
(PHH) व राज्य योजनेच्या (आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL शेतकरी) अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना
ऑनलाईन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा नि:शुल्क (मोफत) उपलब्ध करुन देण्यात येणार
आहे.
त्यामुळे कोणत्याही दलालामार्फत शिधापत्रिकाचे
काम करुन घेऊ नये. तसेच ऑनलाईन शिधापत्रिकासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क अदा करण्यात
येऊ नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment