महाडीबीटी पोर्टलवर अर्ज एक, योजना अनेक
शेतकऱ्यांनी
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत
अर्ज
करण्याचे आवाहन
हिंगोली
(जिमाका), दि. 17 :
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा कार्यक्रम महाडीबीटी पोर्टल मार्फत राबविण्यात
येत आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी वार्षिक कृती आराखडा सन 2023-24 मंजुरीस सादर करण्यात
आलेला आहे. त्यामध्ये क्षेत्र विस्तारमध्ये ड्रॅगन फ्रुट, केळी, सुट्टी फुले, हळद लागवड
व मशरुम उत्पादन प्रकल्पासाठी फुल शेती, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, प्लास्टीक मल्चींग,
मधुमक्षिका पालन, पॅक हाऊस, कांदाचाळ, फिरते विक्री केंद्र (हातगाड्या) इत्यादीचा समावेश
आहे.
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी
योजना’ या सदराखाली नोंदणी करावी. महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
हे संकेतस्थळ असून शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा
केंद्र इत्यादी माध्यमातून महाडीबीटीच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतात. या कृषि विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त शेतकरी
बांधवानी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले
आहे.
No comments:
Post a Comment