कौशल्य मागणी सर्व्हेक्षण आणि उद्योगामध्ये कौशल्याची आवश्यकता
नोंदणी मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि.05 : महाराष्ट्र राज्य
कौशल्य विकास सोसायटी मार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण
योजना राबविण्यात येतात. या महत्वकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी
राज्यातील युवक-युवतीना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केले कौशल्य प्रशिक्षण प्रदान
केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणादरम्यान स्वारस्यामध्ये वृध्दी होऊन अनुपस्थितीचे
प्रमाण कमी होईल आणि प्रशिक्षण यशस्वी उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अधिक
प्रमाणात संधी उपलब्ध होतील.
त्यानुषंगाने राज्यातील युवक-युवतींना
मागणीवर आधारित कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण मोहिमेचे
दि. 1 जुलै ते 31 जुलै, 2023 दरम्यान आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी
गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. त्या गुगल फॉर्मची लिंक https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8
अशी आहे. या लिंकवर भेट देऊन जिल्ह्यातील युवक युवतींनी जास्तीत जास्त प्रमाणात आपली
नोंदणी करावी.
त्याचबरोबर जिल्ह्यातील उत्पादन व सेवा
क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मोठ्या उद्योगांमध्ये कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा विविध
प्रकारच्या जॉबरोलनिहाय आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज नोंदविल्यास त्या कौशल्याच्या
अभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणामध्ये करणे शक्य होईल. त्यामुळे प्रशिक्षणामध्ये
यशस्वी उमेदवारांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या प्रमाणामध्ये वृध्दी
होईल. त्यासाठी उद्योगांच्या मनुष्यबळांमध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी मोहिमेचे आयोजन
करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी https://forms.gle/3LQGQTayTnk2gZWkg
या गुगल लिंकला भेट देऊन आपल्या उद्योगातील कौशल्याची मागणी कळवावी, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment