राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता ताई चव्हाण यांची
सखी वन स्टॉप सेंटर व ट्रेंडस मॉलला भेट
*
महिला कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या
हिंगोली
(जिमाका), दि. 20 : राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिताताई चव्हाण हे आज हिंगोली
दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील महिलांचे प्रलंबित प्रकरणावर चर्चा केली. तसेच येथील सखी
वनस्टॉप सेंटरच्या कार्यालयात जाऊन पाहणी केली व प्रकरणांचा आढावा घेत अडीअडचणीवर मार्गदर्शन
केले. तसेच येथील एनटीसी भागातील ट्रेंडस मॉल मध्ये जाऊन महिला कामगारांच्या समस्या
जाणून घेतल्या.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
आर.आर. मगर, सखी वन स्टॉप सेंटरचे समुपदेशक दिनेश पाटील उपस्थित होते.
*******
No comments:
Post a Comment