हिंगोली(जिमाका), दि. 15 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे कर्ज व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
महामंडळामार्फत अनुदान योजनेअंतर्गत १० कर्ज प्रकरणांचे तसेच बीज भांडवल योजनेअंतर्गत १० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील पात्र व इच्छुक अर्जदारांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी माहे ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने http://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड,आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या जागेचा पुरावा,दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, व्यवसायाचे परवाना (लायसन्स) आदी कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे.
पात्र लाभार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment