हिंगोली(जिमाका), दि. 15 : हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या. (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. यांची उपकंपनी) जिल्हा कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज व अनुदान योजनांकरिता पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
महामंडळाकडे अनुदान योजनेअंतर्गत ०२ कर्ज प्रकरणे, बीज भांडवल योजनेअंतर्गत ०२ कर्ज प्रकरणे, थेट कर्ज योजनेअंतर्गत ०४ कर्ज प्रकरणे, एनएसएफडीसी योजनेअंतर्गत ०१ कर्ज प्रकरण, एनएसएफडीसी सूक्ष्मपत पुरवठा योजनेअंतर्गत ०१ प्रकरण तसेच एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत ०१ प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
हिंदू खाटीक समाजातील इच्छुक व पात्र अर्जदारांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी माहे ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठी हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा.
अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच व्यवसायाचे परवाना (लायसन्स) इत्यादी कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
हिंदू खाटीक समाजातील पात्र नागरिकांनी उपलब्ध योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
***
No comments:
Post a Comment