हिंगोली (जिमाका), दि. 29 : भारत सरकारतर्फे विविध
क्षेत्रांत उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव पद्मभूषण पुरस्कारांद्वारे
केला जातो. प्रजासत्ताक दिन 2027 निमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातून
नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले असून, हिंगोली जिल्ह्यातील पात्र व्यक्तींची नामांकने
सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
पद्म पुरस्कारांचा उद्देश विविध क्षेत्रांमध्ये
विशेष व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेणे हा आहे. कला, साहित्य
व शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य, विज्ञान व अभियांत्रिकी, नागरी सेवा,
व्यापार व उद्योग यांसह विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे
पुरस्कार प्रदान करण्यात येतात. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांच्या
योगदानालाही या पुरस्कारांद्वारे विशेष गौरविण्यात येते.
पद्म पुरस्कार 2027 साठी इच्छुक अथवा पात्र व्यक्तींची
नामांकने विहित नमुन्यात भरून दि. 31 जुलै 2026 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल
http://awards.gov.in वर ऑनलाइन सादर करावीत. नामांकन प्रक्रिया व अधिक माहितीसाठी
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,
हिंगोली यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment