09 June, 2026

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

 

हिंगोली, दि. 9 : कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसमत-औंढा नागनाथ मार्गालगत असलेल्या उसाच्या शेतात एका अनोळखी पुरुषाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे, उंची सुमारे 165 सेंमी, रंग सावळा व शरीरयष्टी मजबूत असून गळ्यात चांदीसदृश साखळी आढळली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

सदर व्यक्तीबाबत अथवा या प्रकरणातील संशयित आरोपीबाबत कोणतीही माहिती असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी (मो. 8668543100) किंवा कुरुंदा पोलीस ठाणे (मो. 8669900691) येथे तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

****

No comments: